ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पालखी सोहळा नियमानुसारच, वारक-यांच्या मागण्या अमान्य

पायी वारी काढण्याची तसेच अधिक वारक-यांना पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची परवानगी अमान्य करण्यात आली आहे. सरकारनं ठरवून दिलेल्या नियमानुसारच पालखी सोहळा व वारीला परवानगी देण्यात आली. तसा आदेशही पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी काढला आहे.

अश्वांना परवानगी नाही

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंधरा दिवसापूर्वी विश्वस्त आणि वारकरी प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती.

या बैठकीत शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक लोकांना परवानगी द्यावी व पालखी प्रस्थान सोहळ्यात अश्वांना परवानगी देण्यावर सकारात्मक चर्चा झाली होती; परंतु शासनाने मंत्रिमंडळात चर्चा करून निर्णय घेतला असल्याने विभागीय आयुक्त यांनी शासनाच्या आदेशाच्या अधीन राहूनच लेखी आदेश काढले आहेत.

तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोविड संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच केंद्रीय कृती गटाने तिसरी लाट येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे खबरदारी घेत हे आदेश काढण्यात आले आहेत.

पंढरपुरात संचारबंदीचा प्रस्ताव

आषाढी यात्रेदरम्यान १७ ते २५ जुलैपर्यंत शहर आणि परिसरातील दहा गावांत संचारबंदीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून, लवकरच याबाबत सविस्तर आदेश निघण्याची शक्यता आहे. यात्रा काळात चंद्रभागेत स्नानासाठी भाविकांनी येऊ नये, म्हणून परिसरात कलम १४४ लागू केले जाणार आहे.

You might also like
2 li