अलिबाग : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यात आरोपसत्र सुरु आहे. किरीट सोमय्या आज कोर्लई (Korlai) गावात गेले आहेत. त्यावेळी तेथील वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावावर कोर्लई गावात १९ बंगले आहेत असा आरोप केला होता त्यांनतर संजय राऊतांनी हे आरोप फेटाळून लावले होते.
त्यानंतर किरीट सोमय्या यांनी मग रश्मी ठाकरे त्या बंगल्याचे कर का भरतात असा सवालही त्यांनी चिचारला आहे. किरीट सोमय्या आज कोर्लई गावातील ग्रामपंचायत मध्ये गेले होते.
किरीट सोमय्या यांच्याबरोबर भाजपचे शेकडो कार्यकर्ते गाड्यांवर बसून त्यांच्यासोबत आले होते. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामपंचात कार्यालयात किरीट सोमय्या गेल्यानंतर शिवसैनिकांनीही आत घुसण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना आतमध्ये जाऊन दिले नाही. किरीट सोमय्या बाहेर आल्यानंतर ग्रामपंचायतीचे गोमुत्राने शुद्धीकरण करण्यात आले.
यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली निमका पत्ता कडवा है…’ ‘चलो जाव, चलो जाव, किरीट सोमय्या चले जाव’च्या घोषणा दिल्या.
तर भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणा दिल्या किरीट सोमय्या आगे बढो’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे थोडावेळापुरते तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.