पुणे – बळीराजा म्हंटलं कि लगेच डोळ्यासमोर उभा राहतो तो आपला करता करविता किंवा शेतकरी (farmer). आपल्या माय मातीशी जोडल्या गेलेला सच्चा दुआ जो कष्ट करतो आणि शेती करून धान्य पिकवतो (agriculture) तो बळीराजा. मात्र, याच शेतकऱ्याची अचानक प्रकृती ढासळली अन् घर चालवायचं कसं हा मोठा पेच समोर उभा राहिला. उदरनिर्वाहासाठी शेती हेच एकमेव साधन असताना घरातल्या कर्त्या व्यक्तीचीच प्रकृती खराब झाली की घर चालवायचं कसं हे मोठं संकट समोर येथून उभं राहत…

पण त्यांनी खचून न जाता आपल्या पतीचं दु:ख वाटून घेतलं खांद्याला खांदा लावून शेतीत नवनवे प्रयोग केले अन् लाखोंचं उत्पन्न मिळवलं (Successful Farmer) आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीरित्या पुढे नेला.

पुणे जिल्ह्यातील बारामती (bramati) तालुक्यातील कांबळेश्वर येथील महिला शेतकरी ‘आशा शिवाजीराव खलाटे’ (Asha Khalate) यांच्या जिद्दीची ही गोष्ट आहे. शेती हेच एकमेव उदरनिर्वाहाचे साधन.. पतीचे दोन्ही मूत्रपिंड निकामी.. अशा वेळी कुटुंब चालविण्याचा पडलेला पेच…

पण या सगळ्या परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पतीचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड देऊन स्वतः आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करून शेतीत नवा प्रयोग करत रंगीत मिरचीचे पीक घेतले.

आणि भरघोस उत्पन्न घेत आशा शिवाजीराव खलाटे (Asha Khalate) आज आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे. रंगीत मिरच्यांचे उत्पन्न घेऊन लाखोंचे उत्पन्न मिळून शेतकऱ्यांसमोर आशा खलाटे यांनी मोठा आदर्श (inspirational story) निर्माण केला आहे.

पतीच्या प्रकृती नंतर शेतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर आल्यानंतर आता आपण शेती फक्त पोट भरण्यासाठी करायची नाही असं आशा यांनी ठरवलं. आशाताईंचं सर्व क्षेत्र बागायती आहे.

शेतीमध्ये विहीर आहे. आपल्या क्षेत्रात ते आत्तापर्यंत निशिगंध, झेंडू, टोमॅटो, कारली, हिरवी मिरची व उस या पिकांची शेती करत आले आहेत. मात्र, या पिकांमध्ये वाढणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांची सांगड कुठेच बसत नव्हती.

अश्यातच त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या 10 गुंठे शेतजमिनीवर हरितगृहाची पायाभरणी केली. दहा गुंठे हरितगृहात त्यांनी रंगीत मिरचीची लागवड केली.

आशाताईंचा हा शेतीमधला डेरिंगबाज प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला. पहिल्याच वर्षी हरितगृहात लागवड केलेल्या मिरचीच्या पिकातून चांगली कमाई झाली. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.

मात्र, हे सगळं सुरळीत चालू असताना अचानक त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेल्या पिकांना आता पाणी कसे द्यायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढ्यात उभा झाला होता.

अश्यातच त्यांनी टँकरच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता केली. सिंचन व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या आधुनिक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. आणि पाणी पाणीटंचाईवर मात केली.

दरम्यान, आशाताई यांनी 20 गुंठे क्षेत्रात उत्पादित केलेली रंगीत मिरची जयपुर, दिल्ली, पटना, भोपाळ, मुंबई, पुणे, कुलमनाली या बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. त्यांना रंगीत मिरचीच्या शेतीतून चांगली कमाई होत आहे.

अनेकांनी आशा शिवाजीराव खलाटे यांच्या या धाडसीपणाचे आणि यशाचे स्वागत आणि सन्मान देखील केला आहे. आशा खलाटे ह्या आपल्या समाजापुढे एक मोठा आदर्श आहेत. आशा खलाटे यांच्या या संघर्षमय प्रवासाचे सर्वांनीच कौतुक केलं आहे.