ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

आशा सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

वारंवार आंदोलनाचा इशारा देऊनही आशा सेविकांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे राज्यात आशा सेविकांनी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यात जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांनी आंदोलन केले.

पाचशे महिला सहभागी

आशा सेविकांनी १५ जूनपासून सुरू केलेल्या संपाचा भाग म्हणून हे आंदोलन होते आहे. जवळपास पाचशेहून अधिक आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील ६६ हजार आशा सेविका व ४ हजार गटप्रवर्तक यांनी १५ जूनपासून राज्यभरात संप सुरू केला आहे.

वाढीव कामाचा मोबदला नाही

आशा स्वयंसेवकांना कराव्या लागत असलेल्या माहितीचे संकलन, अहवाल सादरीकरण,लसीकरण अशा सगळ्या कामाची दरमहा चार हजार रुपयांची रक्कम पूर्णपणे मिळत नाही.

याच बरोबर आशा सेविकांना या कामा व्यतिरिक्त अन्य ७२ कामे करावी लागतात. आणि त्या कामाचा मोबदला त्यांना साधारणपणे २५०० रुपये मिळतो; पण कोरोना काळात त्यांना ८ तास काम करावे लागत असल्यामुळे ही रक्कम मिळणे बंद झाले.

सध्या त्यांना दररोज आठ तास काम करून सुद्धा ५ हजार रूपयांपेक्षा कमी मानधन मिळते आहे. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्याकडून अधिक कामदेखील करून घेतले गेले आहे; मात्र या कामाचा मोबदला म्हणून या आशा स्वयंसेविकांना काहीही पैसे देण्यात आले नाहीत.

You might also like
2 li