पंढरपूर – महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या प्रथेप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2022) पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी (Vitthal Rukmini) मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.

आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची (Vitthal Rukmini) शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली.

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांच्याच हस्ते विठ्ठलाची (Vitthal Rukmini) शासकीय महापूजा होण्याचा मार्ग मोकळा झाला.

शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.

त्यानंतर पहाटे ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापुजेसाठी (Ashadhi Ekadashi 2022) उपस्थित होते.

दरम्यान, महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मान मिळाला. गेल्या वीस वर्षांपासून ते वारी करत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, वारीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार मानतो. मला आज पुजा करण्याचा मला मान मिळाला. आमच्या चार पिढ्याने पुजा केली हे भाग्य सर्वांना मिळावं.

पूर येऊ नये पण बळीराजा सुखी राहू दे. बळीराज्याचे संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायानाट होऊ द्या, असं साखडं पांडूरंगाला घातल आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीडियाशी बोलताना सांगितलं.