पुणे – आज आषाढी एकादशी (Today Aashadhi Ekadashi) आहे. गेल्या आळंदी, देहू, शेगाव अशा ठिकठिकाणाहून वारकरी (Pandharpur wari 2022) आपल्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी (vitthal darshan) काल पंढरपुरात दाखल झाले. आज आषाढी एकादशी (Ashadhi Wari) निमित्त पंढरपूर नागरीत वैष्णवांचा जनसागर पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरापासून ज्या विठुरायाच्या दर्शनाची आस लावून मजल दर मजल करत पंढरपूर जवळ करणाऱ्या वारकऱ्यांची आणि पांडुरंगाची आज अखेर भेट झाली आहे.

आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Wari) संपूर्ण महाराष्ट्रात आज चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी त्यांच्या भात शेतीत रोपांच्या सहाय्याने विठ्ठलाची मूर्ती साकारली.

मुळशी (Mulshi) तालुक्यातील वातुंडे (Vatunde) गावात बाळकृष्ण शिंदे (Balkrishna Shinde) सामायिक शेतात ही विठ्ठल मूर्ती साकारली.

महिन्याभरापूर्वीच पेरलेली भाताची रोपं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे उगवून आली. यात मूर्ती दिसते. सध्या या मूर्तीची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.

दरम्यान, करोनाच्या (corona) संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला (Ashadhi Wari) खंड पडलेला होता. मात्र मोजक्या वारकऱ्यांमध्ये परंपरा कायम राखली गेली.

पण आता करोना (corona) आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध हटवले. त्यामुळे पुन्हा एकदा भाविक आपल्या लाडक्या विठूरायाची भेट घेण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत.

तसेच, महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या प्रथेप्रमाणे आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा पार पडली.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.