मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री (CM) शस्त्रक्रिया झाली असल्यामुळे प्रत्यक्ष कामावर गेली काही दिवस हजार राहू शकलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाचा आशिष शेलारांनी (Ashish Shelar) चांगलाच समाचार घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी बोलताना प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असे म्हणत भाजप नेत्यांवर टीका केली होती. यालाच उत्तर देताना भाजप (BJP) आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

आशिष शेलार यांनी त्यांच्या ट्विटर (Twiter) हॅण्डलवरून सलग ४ ट्विट केले आहेत. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारत त्यांना खोचक टोला लगावला आहे.

Advertisement

गारगाई धरणाच्या खर्चाच्या कितीतरी पट जास्त खर्च करुन समुद्राचे पाणी गोडे करण्याचा हट्टाहास का? गेल्या २४ वर्षात २१ हजार कोटी खर्च करुनही मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे का?

११४ % नालेसफाई करुनही मुंबईत पाणी का तुंबते? मुंबई पालिका वर्षाला साडेचार हजार कोटी आणि पाच वर्षात २२ हजार ५०० कोटी खर्च करुनही पालिकेच्या रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडून रुग्ण मरतोच कसा?

वरळीच्या सिलेंडर स्फोटातील रुग्णांचा मृत्यू का झाले? मृतदेहा शेजारीच कोरोना रुग्णांना उपचार का दिले? परीक्षा रद्द करणारेच विद्यापीठात पदवीदान समारंभाला पाहुणे कसे?

Advertisement

ज्यांनी प्रकल्पांना विरोध केला तेच आज प्रकल्पांचे श्रेय घ्यायला आणि नावं द्यायला पुढे पुढे कसे ? असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरले आहे.

असे बरेच प्रश्न मुंबईकरांना (Mumbai) रोज पडतात, आम्ही ते विचारत राहू. कारण… प्रश्न विचारायला फार अक्कल लागत नाही ?, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Advertisement