मुंबई : शिवसेना (Shivsena) खाजदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) केलेल्या टीकेचा भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी समाचार घेतला आहे. यावेळी शेलार म्हणाले की महाविकासआघाडी सांभाळुन घेणारे आता एकटे पडले आहेत.

संजय राऊत व भाजप यांचे सतत एकमेकांवर टीकास्त्र चालू असते. तसेच आता केंद्रीय तपास यंत्रणा मागे (ED) लावण्यावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आता भाजपवर टीकेचे बाण सोडले आहे.

मात्र आता भाजप नेते आशिष शेलार यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी शेलार म्हणाले की, संजय राऊत तुम्ही महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) निर्मितीसाठी प्रयत्न केले आणि आत्ता या ३ पक्षातील कोणतेच नेते त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही आहेत.

Advertisement

त्यांचे दुर्दैव आहे की ते आज एकटे पडले आहेत. ज्या माणसाला स्वतःच पक्षच कोणता हे कळत नाही आहे, अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.

तसेच संजय राऊत तुम्ही फडणवीस साहेब यांच्या घराच्या बाहेर याच आम्ही बघू असे खुले आव्हानही त्यांनी राऊतांना केले आहे.

पुढे ते म्हणाले की २०१४ पासून २०२१ पर्यंत प्रत्येक दिवस आणि इतके वर्ष भाजपच्या विरोधात तुम्ही लिहीत आहात. ७ वर्ष तुम्ही भाजपला बदनाम करण्याचे काम करत आहात. गेली ७ वर्ष तुमच्या पाठी ED का लागली नाही? असा सवालही त्यांनी विचारला आहे.

Advertisement

त्याचसोबत भाजपच्या विरोधात सातत्याने बोलणारे निवडणुकीत तोंडावर पडले हे कधी बोलणार का? निःपक्षपाती कसला? नारायण राणे (Narayan Rane)यांच्यावर गुन्हा दाखल केला ते निःपक्षपाती पणे केले आहे का?

नितेश राणे (Nitesh Rane) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर सुद्धा जे गुन्हे दाखल केले त्या त निःपक्षपातीपणा होता का? हा पक्षपाती पणा आहे, असे अनेक प्रश्न शेलारांनी उपस्थित केले आहेत.

Advertisement