मुंबई – केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद (parliament) भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (Ashoka On Parliament Building) अनावरण केलं.

दरम्यान, हे अशोक स्तंभ (ashoka stambha) तयार करण्यासाठी 100 हून अधिक कामगार आणि 9 महिन्यांहून अधिक कालावधी लागला आहे.

उच्च शुद्धतेच्या कांस्यांपासून बनवलेले भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्थापित करणे हे एक आव्हान होते कारण ते जमिनीपासून 33 मीटर उंच आहे.

मात्र, नव्या संसद भवनाच्या इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभातील (ashoka stambha) सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रा आक्रमक असल्याचं मत काहींनी व्यक्त केले आहे.

भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ बदलण्यात (ashoka stambha) आल्याचे बोलले जात आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला असून, अभिनेता प्रकाश राजने (Prakash Raj) ट्विटवर एक छायाचित्र शेअर करुन प्रश्न विचारला आहे.

प्रकाश राज (Prakash Raj) यांनी जे छायाचित्र शेअर केले आहे. त्यात जुने आणि नवीन भगवान राम, जुने आणि नवीन हनुमान आणि जुने-नवीन अशोक स्तंभाचे छायाचित्रात फरक दाखवला आहे.

त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याने विचारले, आपण कुठे चाललो आहोत..? फक्त विचारत आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे.

“तुम्ही केवळ हिंदूंनाच का विचारता? तुम्हाला हे दिसत नाही का?, हा नवा हिंदुस्तान! जे लोक राष्ट्रहिताविरोधात आहेत, त्यांनी घाबरणे आणि ट्विट करण्याची गरज आहे. इ. अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.