मुंबई – केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद (parliament) भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी नवीन संसद भवनाच्या छतावर बनविण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (Ashoka On Parliament Building) अनावरण केलं.

दरम्यान, हे अशोक स्तंभ (ashoka stambha) तयार करण्यासाठी 100 हून अधिक कामगार आणि 9 महिन्यांहून अधिक कालावधी लागला आहे.

उच्च शुद्धतेच्या कांस्यांपासून बनवलेले भारताचे राष्ट्रीय चिन्ह स्थापित करणे हे एक आव्हान होते कारण ते जमिनीपासून 33 मीटर उंच आहे.

मात्र, नव्या संसद भवनाच्या इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभातील (ashoka stambha) सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रा आक्रमक असल्याचं मत काहींनी व्यक्त केले आहे.

भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ बदलण्यात (ashoka stambha) आल्याचे बोलले जात आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला असून, सिनेअभिनेते अनुपम खैर (Anupam Kher) यांनी सुद्धा एकट्विटकरत आपले मत व्यक्त केलं आहे.

ट्वीटमध्ये अनुपम खैर (Anupam Kher) म्हणतात की, नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील आहे. आणि सिंहाला दात असतील तर तो दाखवणारच तो स्वतंत्र्यातील सिंह आहे. गरज लागली तर तो चावेल सुद्धा’

असं म्हणत त्यांनी या सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रेची पाठराखण करणारी भूमिका घेतली आहे. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘अशोक स्तंभ’ वापरण्याची परवानगी नेमकी कोणाला असते….

भारत देशाचं राष्ट्रीय प्रतिक असलेला अशोक स्तंभ (ashoka stambha) वापरण्याची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना नाही. केवळ घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच याचा वापर करू शकतात.

यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, न्यायपालिका आणि सरकारी संस्थांचे उच्च अधिकारी यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त एखाद्याने अशोक स्तंभाचा वापर केला तर त्यांना 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.