Mumbai: Shiv Sena leader Sanjay Raut addresses a press conference in Mumbai, on Oct 12, 2015. (Photo: IANS)

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी घोटाळा केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनी सोमय्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय राऊत आज पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन कोणता गौप्यस्फोट करणार तसेच भाजपचे कोणते साडे तीन लोक आत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांची आज शिवसेना भवनात (Shivsena Bhawan) पत्रकार परिषद होणार आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्याअगोदर एक ट्विट (Twit) केले आहे. शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे, राहत इंदौरी असे ट्विटला कॅप्शन दिले आहे.

Advertisement

पत्रकार परिषद घेण्यापूर्वी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज पत्रकार परिषद होणार आहे. मी स्वत:च जाहीर केले आहे. त्यामुळे तुम्ही थोडी वाट पाहा. आमचीही पत्रकार परिषद पाहा.

या, ऐका. कधी तरी शिवसेनेचे ऐका. सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत असे म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत राऊत काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरु आहे त्याबद्दलही संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या रेड संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल तर राज्य आणि केंद्राने एकत्रित कामे केले पाहिजे.

Advertisement