खंडणी वसुली आणि मनी लाँडरिंग प्रकरणी चाैकशीला सामोरे जात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबाची साडेतीनशे कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

खरेदी सव्वाचार कोटींची; बाजारभाव साडेतीनशे कोटी

देशमुख यांची चार कोटी वीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे शुक्रवारी सांगण्यात आले होते; परंतु आता हाती आलेल्या माहितीनसार, ही मालमत्ता चार कोटी वीस लाखांची नसून, साडेतीनशे कोटी रुपयांची आहे.

मालमत्ता खरेदी केली, तेव्हा तिची किंमत चार कोटी वीस लाख होती आणि आचा बाजारभावाने ती सा़डेतीनशे कोटी रुपये झाली आहे.

ईडी आणि सीबीआयची एकाच वेळी चाैकशी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांची खंडणी वसुलीचा आरोप केला होता.

देशमुख यांची सीबीआय आणि ईडी एकाच वेशळी चाैकशी करीत आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात देशमुख, त्यांच्या पत्नी आरती आणि मुलगा सलील यांची चाैकशी सुरू आहे.

त्यांना ईडीने चाैकशीसाठी नोटिसा बजावल्या असल्या, तरी अजून या तिघापैकी एकही जण प्रत्यक्ष चाैकशीसाठी हजर राहिलेला नाही.

चाैकशीला हजर राहण्यास टाळाटाळ

देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते, तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं; मात्र दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

त्यानंतर ईडीने देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.

आठ एकर 30 गुंठे जमीन जप्त

ईडीने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील आठ एकर 30 गुंठे जमीन जप्त केली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे.

उरण पोर्ट आणि पळस्पे फाटा दरम्यान ही जमीन आहे. संबंधित जमीन ही नव्याने सुरू होत असलेल्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे.

मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असल्याने तिचा भाव प्रचंड आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे.

जमिनीची किंमत 350 कोटी

देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची भागीदारी असलेल्या प्रीमियर पोर्ट लिंक प्रा ली या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन 2004 ते 2015 या काळात विकत घेतली आहे. त्याकाळात त्यांनी ही जमीन दोन कोटी 67 लाख रुपयांना विकत घेतली आहे.

आठ एकर 30 गुंठे म्हणजे एकूण 350 गुंठे जमीन झाली. प्रत्येकी एक कोटी रुपये गुंठा इतकी किंमत असल्याने या जमिनीची किंमत सुमारे 350 कोटी रुपये होते.