मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडीवर (ED) गंभीर आरोप (Allegations) केला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात (girl’s wedding) जो फुलवला डेकोरेशन करण्यासाठी आला होता त्याला ईडीने उचलले होते असा आरोप केला आहे.

संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये (Delhi) पत्रकार परिषद (Press conference) घेतली. यामध्ये त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) गैरवापर केंद्राकडून होत आहे असा गंभीर आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

संजय राऊत म्हणाले, फूलवाल्याला (Florist) जेव्हा पैशांबाबत विचारणा करण्यात आलेली तेव्हा त्यानं कोणतेही पैसे न घेतल्याचे म्हंटले आहे. राऊतांची मुलगी ही माझ्या घरातल्याप्रमाणेच आहेत.

Advertisement

तिला मी लहानाचे मोठे होताना पाहिले आहे. तिच्या लग्नात मी पैसे कसे काय घेऊ, असे म्हटल्यानंतर गन पॉईन्टवर त्याला ईडीच्या लोकांनी धमकावले असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत १० मोठी वक्तव्य केली आहेत. यामध्ये त्यांनी ईडी या केंद्रीय तपास यंत्रणेवरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्यांना आलेला अनुभवही सांगितला आहे.

Advertisement