Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

तपापासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला

चोराला शोधायला गेलेल्या पोलिस पथकावर चोरटा व त्याच्या सहका-यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पोलिसही गांगरून गेले. या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

जबरी चोरीची मिळाली होती माहिती

गुन्हे शाखा (युनिट १ )वाहनचोरी विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस शिपाई श्रीकांत दगडे व ऋषिकेश कोळप हे वारजे परिसरात गस्त घालीत असताना त्यांना येथील म्हाडा कॉलनी परिसरात खबऱ्या धीरज डोलारे (रा. धनकवडी पुणे) यांना अभिजीत खंडागळे (रा.चौथा मजला, म्हाडा कॉलनी, आरएमडी कॉलेजजवळ) याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे असून त्याचा वापर करून तो एक दोन दिवसात आपल्या साथीदारांसह परिसरात जबरी चोरी करणार आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली होती.

त्याबद्दल आपल्या वरिष्ठांना कळवून हे दोघे पोलिस कर्मचारी म्हाडा कॉलनी परिसरात बिल्डिंग क्रमांक 2 येथे पोहोचले.

Advertisement

खब-या गंभीर जखमी

अभिजीत खंडागळे राहत असलेल्या चौथ्या मजल्यावर जिन्याद्वारे पोलिस कर्मचारी वर जात असताना खाली काही तरुण मुले त्यांच्याकडे संशयाने पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

पोलिस कर्मचारी हे साध्या वेशात असल्यामुळे त्यांना ते पोलिस आहेत असे वाटले नाही. तसेच पोलिस बातमीदार धीरज डोलारे हा पोलिसांना कायम चुकीची माहिती देऊन कॉलनीतील रहिवाशांना नाहक त्रास देतो, असा समज करून काही लोकांनी त्यांच्याशी बाचाबाची सुरू केली.

त्यांच्यात वाद वाढत जाऊन सर्वांनी धीरज डोलारे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांवर बांबू, सिमेंट ब्लॉक, स्टँप इत्यादी द्वारे हल्ला करून मारहाण केली. त्यात डोक्यात ब्लॉक लागल्याने डोलारे गंभीर जखमी झाला.

Advertisement

२७ आरोपींची पटली ओळख

या वेळी पोलिसांनी आम्ही पोलिसांनी सरकारी कामात तुम्ही अडथळा आणू नका असे वारंवार सांगूनही आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवून, मारहाण करून गंभीर जखमी केले.

यानंतर जखमींना वारजेतील जवळच्या माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणाऱ्या सुमारे दीडशेपेक्षा जास्त आरोपींपैकी सत्तावीस आरोपींची ओळख पटली असून इतरांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.

Advertisement
Leave a comment