लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागे गेलेल्या महिलेवर दोन भावांनी शेतात ओढत नेत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत विचारणा करण्यास गेलेल्या पीडित महिलेच्या नातेवाइकालाही कोयत्याने व काठीने मारहाण केली.

यात त्याचे नाकाचे हाड मोडले अाहे. ही घटना युसूफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत ९ जून रोजी घडली. याप्रकरणी संतोष सोनवणे, भास्कर सोनवणे, प्रभावती सोनवणे,

अशोक सोनवणे यांच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला. पीडित महिला ही शेतवस्तीवर वास्तव्यास असून ती पहाटे ४ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी घराच्या पाठीमागे गेली होती.

ही संधी साधून संतोष मारुती सोनवणे व भास्कर मारुती सोनवणे यांनी तिला ओढत नेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करत छेड काढली. त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडितेने घरी सांगितले होते.