जुन्नर – हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, मात्र भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे (Raksha Bandhan 2022) वेगळेच महत्त्व आहे. रक्षाबंधन (Raksha Bandhan) हे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, हा सण दरवर्षी श्रावण (Sharawan Pornima) महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधते आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तसेच भाऊसुद्धा बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

आणि याच सणाचे औचित्य साधून अनेक राजकीय नेत्यांनी हा रक्षा बंधनाचा सण साजरा केल्याचे दिसून आले आहे. जुन्नरचे काँग्रेस आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांना एक नाही दोन नाही तर 7500 महिलांनी राखी बांधून राखी मॅन केले आहे.

हा एक नवा विक्रमच जणू झाला आहे. दोन्ही हात राख्यांनी (Raksha Bandhan) गच्च भरून गेले होते. याविषयी भावना व्यक्त करताना कृतज्ञ भाव असल्याचे सांगितले.

आज दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला. या रेशमी क्षणांची भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, अशी प्रतिक्रिया अतुल बेनके (Atul Benke) यांनी व्यक्त केली.

आपल्या या जिव्हाळ्याच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आज मला मिळाली.

हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील, याची खात्री देतो, अशी ग्वाही अतुल बेनके यांनी दिली.

काय आहे अतुल बेनके यांची फेसबुक पोस्ट वाचा…

एक धागा भाऊ बहिणीच्या नात्यातील ऋणानुबंधाचा… राखी पौर्णिमा म्हणजे भाऊ बहिणीमधील हळुवार प्रेमळ नात्याचा सण. मायेने बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते तो दिवस.

भावाबहिणीच्या प्रेमाचे प्रतीक व बहीण-भावाचे अतूट नाते सांगणारा हा सण. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुन्नर तालुक्यातील विविध भागातून आलेल्या अनेक भगिनींनी नारायणगाव येथील आमच्या निवासस्थानी येऊन मला प्रेमाने आपुलकीने राख्या बांधल्या आणि रक्षाबंधन सण साजरा केला.

या दिवसाची मी दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या बहिणींना भेटून आनंद व्यक्त करण्याचा हा दिवस.

आज दिवसभरात तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या माझ्यावर माया असणाऱ्या या सर्व भगिनींनी आजचा दिवस अविस्मरणीय केला.

या रेशमी क्षणांची भावना मला शब्दांत व्यक्त करता येत नाहीये. आपल्या या जिव्हाळ्याच्या नात्याची कायम जाण ठेवून, सचोटीने, उत्साहाने आणि आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा आज मला मिळाली.

हा रेशमी धागा आयुष्यभर अतूट राहील हा भाऊ तुमच्या प्रत्येक सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहील याची खात्री देतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने माझ्या सर्व भगिनींना मी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.