Avatar 2: बॉक्स ऑफिसवर हॉलिवूडचा अवतार 2 हा चित्रपट तीन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
तब्बल 13 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शुक्रवारी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला पहिला भाग ‘अवतार’ हा 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता.
दरम्यान शुक्रवारी अवतार 2 प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तब्बल 41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच रविवारी या चित्रपटाने 46 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्याचबरोबर तर शनिवारीही 45 कोटींहून अधिक गल्ला जमवला.
या तीन दिवसांच्या आकडेवारीनुसार ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ने तब्बल 133 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. रविवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन रिपोर्टनुसार, चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन पहिल्या वीकेंडला 150 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. जगभरातील कमाईचा हाच आकडा 450 दशलक्ष डॉलर्सच्या जवळ गेला आहे.
‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा जगभरातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन तीन अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचले होते.