Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अविनाश भोसलेंची संपत्ती जप्त

मुंबईः गेल्या सहा-सात महिन्यांपासून बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अवैध मालमत्तेची चाैकशी करीत आहे. आता त्यांची ४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फेमांतर्गत कारवाई

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले व कुटुंबीयांची ४०.३४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) फेमा कायद्यांतर्गत ही कारवाई केली. ही सर्व मालमत्ता समभागांच्या रूपात आहे. भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी दुबईच्या रोचडेल असोसिएट्स लिमिटेडमधील समभागांच्या बदल्यात ४०.३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता दुबईत खरेदी केली.

Advertisement

हा व्यवहार करताना परकीय चलन व्यवस्थापन कायदा अर्थात ‘फेमा’चे उल्लंघन केले. या कायद्यानुसार विदेशातील मालमत्तेइतकी संपत्ती भारतात जप्त केली जाते.

तीन हाॅटेलमधील समभाग जप्त

‘ईडी’ने केलेल्या कारवाईंतर्गत भोसले यांच्या तीन पंचतारांकित हॉटेल्स असलेल्या क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, पुण्यातील हॉटेल वेस्टइन,

नागपूरचे हॉटेल ला मेरिडियन, गोव्याचे हॉटेल डब्ल्यू रीट्रिट व अविनाश भोसले इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडमधील समभाग जप्त करण्यात आले.

Advertisement

त्याखेरीज त्यांच्या व कुटुंबीयांच्या नावे विविध बँक खात्यामध्ये असलेली १.१५ कोटी रुपयांची रोकडदेखील जप्त करण्यात आली. या प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.

Leave a comment