पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी दिलेला शब्द पाळत पुणे जिल्ह्यातील निमगाव दावडी (Pune district) येथे १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी मारली आहे.
अमोल कोल्हे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचा घोडीवर बसून बैलजोडीसमोर बारी मारत असल्याचा व्हिडिओ त्याचा मित्र शेखर पाचूंदकर (Shekhar Pachundkar) यांच्या आई लक्ष्मीबाई पाचूंदकर (Lakshmibai Pachundkar) यांनी पाहिला होता.
त्यानंतर मित्राच्या मातोश्रींनी कोल्हे यांना घरी बोलवून “बाबा परत असा घोडीवर बसत जाऊ नकोस” अशी तंबी देत त्यांची दृष्ट काढली आहे.
हा व्हिडीओ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर करत मातामाऊली अशी काळजी घेतात तेव्हा आणखी बळ मिळतं! अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी (Bullock cart race) दिल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत आहे.
बैलगाडा शर्यतीवरून खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेला शब्द आज पाळला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले होते, बौलगाडा शर्यत पुन्हा सुरू करु आणि घोडीवर बसून बारी मारणार.
अखेर त्यांनी दिलेला शब्द पाळत १६ फेब्रुवारी रोजी घोडीवर बसून बारी मारली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना आव्हान दिले होते.
मात्र, बैलगाडा शर्यती सुरू झाल्यानंतरही अमोल कोल्हे हे बैलगाडा शर्यतीत दिसून आले नाहीत. त्यानंतर १० फेब्रुवारी २०२२ ला शिवसेनेचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंना आव्हान दिले होते.