मुंबई – बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) हा चित्रपट जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. तथापि, नुकतीच अशी बातमी आली होती की हा चित्रपट स्थगित करण्यात आला होता परंतु निर्मात्यांकडून असे कोणतेही विधान आले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीही यापूर्वी या चित्रपटाबद्दल म्हटले होते की, गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan) या चित्रपटाशी त्यांच्या चित्रपटाचा काहीही संबंध नाही आणि हा पूर्णपणे वेगळा चित्रपट असेल.

सध्या अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) कास्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये झळकणार जान्हवी कपूर

सूत्रांच्या माहिती नुसार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) मुख्य अभिनेत्री म्हणून कास्ट करण्याची चर्चा आहे.

सांगण्यात आले आहे की, चित्रपटाची टीम जान्हवी कपूरला टायगर श्रॉफसोबत आणण्याचा विचार करत आहे. त्याच वेळी, निर्माते अद्याप अक्षय कुमारसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहेत. मात्र, चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ 2023 मध्ये रिलीज होणार आहे

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे शूटिंग जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग युरोपमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी आणि पूजा एन्टरटेन्मेंट यांनी केली आहे. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये 2023 च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे.