देशभर गाजलेल्या आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा विषय ठरलेल्या पालघरमधील साधू हत्याकांडाला जातीय वळण देण्यात आले होते; परंतु तपासात तसे काहीही नसल्याचे स्पष्ट झाले होते.

केंद्र व राज्य सरकारमधील संघर्षाला ही घटना कारणीभूत ठरली होती. आता या घटनेतील १४ जणांना जामीन मंजूर झाला असून जामीन मंजूर झालेल्यांची संख्या आता २०८ झाली आहे.

१८ जणांचा जामीन नामंजूर

पालघरमधील साधू हत्याकांड (गडचिंचले झुंडबळी) प्रकरणात अटक झालेल्या आणखी 14 जणांचा जामीनअर्ज मंजूर करण्यात आला आहे.

Advertisement

ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने याबाबतचा आदेश दिला आहे, तर दुसरीकडे इतर 18 जणांचा जामीनअर्ज ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या दालनात याप्रकरणी सुनावणी पार पडली.

228 आरोपींना अटक

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी एकूण 228 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. त्यामध्ये 75 जणांना मुख्य आरोपी करण्यात आले आहे.

Advertisement

तर हत्येप्रकरणी 808 संशयितांची चौकशी करण्यात आली होती. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेल्या 194 आरोपींना ठाणे न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला होता.

११ हजार पानांचे दोषारोपपत्र

दरम्यान या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू येथील न्यायालयात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केली होती.

या प्रकरणात कोणतेही जातीय कारण नसून काही अफवा असल्याचा दावा सीआयडीने तपासणीत केला होता.

Advertisement

काय आहे प्रकरण ?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता.

16 एप्रिल रोजी रात्री उशिरा इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहन चालकासह तिघे जण होते. दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली.

त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली होती.

Advertisement