बायको पांढ-या पायाची आहे. तिचा पायगुण चांगला नाही, तिच्यामुळे तू आमदार-मंत्री होऊ शकणार नाहीस, असा सल्ला देऊन उद्योजक गणेश गायकवाडला पत्नीचा छ्ळ करायला प्रवृत्त करण्यास कारणीभूत ठरलेला कथित अध्यात्मिक गुरू रघुनाथ येमूल याला जामीन मिळाला आहे.

उद्योजकाच्या कुटुंबातील सुनेचा छळ

पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक झालेल्या बड्या राजकीय गुरुला जामीन मिळाला आहे. येमुल याची 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली.

येमुलच्या विरोधात कुणी तक्रारदार पुढे आल्यास त्याला पुन्हा पोलिस कोठडी देता येऊ शकते, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

Advertisement

काय आहे प्रकरण ?

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 वर्षीय पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती.

जानेवारी 2017 पासून सासरच्या मंडळींकडून आपला छळ होत असल्याचा आरोप तिने केला आहे. अटकेतील आरोपींमध्ये राजकीय गुरु रघुनाथ येमुलचाही समावेश होता.

रघुनाथ येमुल कोण आहे ?

रघुनाथ येमुल हा स्वत:ला ‘ज्योतिषाचार्य’ तसेच ‘ध्यानगुरु रघुश्री’ म्हणवून घेतो. त्याने ध्यानगुरु रघुश्री या नावानेच आपली ओळख निर्माण केली. त्याने स्वत:चा नीती संप्रदायही सुरु केला आहे.

Advertisement

‘सोशल मीडिया’द्वारे तो रोजच्या दिवसाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त सांगतो. त्याच्याकडून आपला हात पाहण्यासाठी अपॉईटमेंट घ्यावी लागते. त्याच्याजवळ केवळ हात पाहण्यासाठी काही हजार रुपये मोजावे लागतात.

हात पाहण्याचा हा कार्यक्रम जवळपास एक तास चालतो. त्यातून तो त्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढतो. येमुल याने सिद्धी कार्मयोगी फाऊंडेशनची स्थापना केली आहे. तो या फाऊंडेशनचा अध्यक्ष आणि गोसेवा शोध केंद्राचा कन्व्हेअर आहे.

गणेश नानासाहेब गायकवाड कोण आहे ?

गणेश नानासाहेब गायकवाड हा औंध परिसरात राहतो. तो प्रसिद्ध उद्योजक असून पाषाण आणि बाणेर परिसरात त्याच्या अनेक मालमत्ता आहेत.

Advertisement

औंध आणि बाणेर परिसरात त्याने अनेक मॉल, आयटी कंपन्या, दुकाने यांना आपल्या जमिनी, दुकाने, कार्यालये भाडेतत्त्वावर दिली आहेत. यातून गणेश गायकवाड याला दरमहा अडीच ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती आहे.

भाजपतून काँग्रेसमध्ये

काही दिवसांपूर्वी त्याने भाजपला रामराम करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पिंपरी-चिंचवडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप हे गणेश गायकवाड याचे जवळचे नातेवाइक आहेत.

Advertisement