मुंबई – महाराष्ट्राचे राजकारण अत्यंत प्रगल्भ आहे. देशाला अनेक दिग्गज नेतृत्व महाराष्ट्राने (Maharashtra) दिले आहे. त्यातील एक महत्त्वाचे नेतृत्व म्हणजे हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray). स्वाभिमानी असं हे नेतृत्व देशालाच नव्हेतर संपूर्ण जगाला परिचित होत. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला.

आज बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जाऊन आज 10 वर्षे झाली. त्यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय.

“साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..,” असं ट्विट करत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय.

एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दादरच्या शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे (Balasaheb Thackeray Smritisthal) दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. पण स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री जात नाही तोपर्यंतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक त्याठिकाणी दाखल झाले.

त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यामुळे स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. शिवसैनिकांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले. यावेळी या शिवसैनिकांसोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.