file photo

पुणे : कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्कात २५ टक्के कपात करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरली असताना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी हा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे स्पष्ट केले.

कुलगुरूंशी आज चर्चा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांचे २५ टक्के शुल्क माफ केले; पण खासगी महाविद्यालयांचे अभियांत्रिकीसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी करण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत, त्याबाबत शुल्क नियंत्रण प्राधिकरणा (एफआरए)कडून सुवर्णमध्य काढला जाईल,

अशी सावध भूमिका सामंत यांनी घेतली. सोमवारी राज्यातील सर्व कुलगुरूंसोबत बैठक होणार असल्याने त्यामध्ये विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांचे शुल्क कपात करावी, अशी सूचना करणार असल्याचे आश्वासन सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले.

Advertisement

विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव
कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण यासह इतर शुल्क कमी करावे, अशी मागणी केली जात होती; पण याबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता.

सरकार खासगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर दुजाभाव करत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून केला जात होता. याबाबत सामंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टीकरण दिले.

शुल्क कपातीबाबत सुवर्णमध्य काढू
गेले काही महिने ‘एफआरए’ची समिती कार्यरत नव्हती; पण नुकतीच गठित झाली आहे. या समितीच्या अध्यक्षांकडून विद्यार्थी,

Advertisement

पालक व संस्था यांच्याशी चर्चा करून शुल्क कपातीबाबत सुवर्णमध्य काढला जाईल, तसेच एफआरएकडून राज्य सरकार शुल्क कपातीबाबत प्रस्ताव मागविल, असे त्यांनी सांगितले.

जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्ये सीईटी
बारावीचा निकाल लागल्यानंतर व गुणपत्रिका हातात आल्यानंतरच अभियांत्रिकीसह इतर पदवी अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा होऊ शकते.

ही परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.

Advertisement