file photo

दौंड : शहीद भगतसिंग चौकातून खासगी वाहनामार्फत अवैध वाहतूक करणाऱ्यांना एसटीच्या निवारा स्थानकापासून २०० मीटरपर्यंत वाहने लावण्यास पोलीसनिरीक्षक विनोद घुगे यांनी बंदी घातली आहे.

या नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. चौकातून कुरकुंभ बारामती फलटणकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनाने नेले जाते. या अवैध वाहतुकीमुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठ्याप्रमाणावर परिणाम होत आहे.

चौकातून होणारी अवैध वाहतूक त्वरित बंद करावी, अशी मागणी एसटी कामगार व आगार व्यवस्थापक यांनी केलेली आहे. याचे निवेदन दौंड पोलीस स्टेशनचे अधिकाऱयांना दिले आहे.

Advertisement

घुगे यांनी दखल घेऊन कारवाई केली. भगतसिंग चौकात एसटीने ने प्रवास करणाऱ्यांसाठी आ. राहुल कुल यांनी निवारा बस स्थानकासाठी आमदार निधीतून मदत केली.