सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दारू विकण्याचा गुण लावला आहे,असे वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंबद्दल (Supriya Sule) संतापजनक विधान ह. भ. प. बंडातात्या महाराज यांनी मीडियासमोर (Media) केले आहे. त्यामुळे ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत.

अजितदादाने हा गुण लावला ना दारु विकण्याचा. आधी अजितदादांनी सांगितले मंदिर सुरू करायची नाहीत. अजितदादांनी सांगितले ज्ञानोबारायांची दिंडी काढायची नाही.

हे सर्व निर्णय अजितदादांचे आहेत. मी जाहीर सांगतो ही मनमानी आणि दादागिरी आहे. तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, अशी विधाने बंडातात्या कराडकरांनी केली आहेत.

Advertisement

तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबतही बंडातात्या यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर मोठा गदारोळ उडालेला आहे. यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

काल बंडातात्या यांनी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) तसे सज्जन आहेत. पण अजितदादांनीच त्यांना वाईन विक्रीचा निर्णय घेण्यास भाग पडल्याचे धक्कादायक विधान बंडातात्यांनी केले आहे.

तसेच ढवळ्याशेजारी पोवळा बांधला. त्यामुळे वाण नाही पण गुण लागणारच,असेही विधान कराडकरांनी ( Bandatatya Karadkar) केले होते.

Advertisement

परंतु आता पुन्हा नेत्यांच्या मुलांना बंडातात्या टार्गेट करत असून मुले दारू पितात व माझ्याकडे पुरावे आहेत,असे सांगत आहेत.

यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केल्यामुळे सर्वत्र संताप दिसून येत आहे.

Advertisement