पुणे – तुम्ही जर सरकारी नोकरी (job) शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेत नोकरीचं (bank job vacancy) स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुर्वण संधी चालून आली आहे. होय.., बँक ऑफ बडोदामध्ये (bank of baroda) अनेक पदांसाठी भरती होत आहे. त्यामुळे नोकरीच्या (bank job vacancy) शोधात असणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये एकूण 325 पदांची भरती करण्यात येणार असून, रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट, क्रेडिट एनालिस्ट कॉर्पोरेट म्हणून उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

बँक ऑफ बडोदा (BOB) ने कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट विभागासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी म्हटलं होत. आणि त्यालाच धरून ही महाभारती करण्यात येणार आहे.

Advertisement

दरम्यान, तुम्हाला देखील या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही बँक ऑफ बडोदाच्या (BOB) अधिकृत वेबसाईट वर म्हणजेच, bankofbaroda.in वर 12 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत.

अर्ज सादर करताना BOB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (http://www.bankofbaroda.co.in) त्यानंतर स्पेशलिस्ट ऑफिसर रिक्रूटमेंट 2022 शी संबंधित लिंकवर क्लिक करा.

नंतर ‘Apply Online’ वर क्लिक करा. नोंदणी करा आणि आपले तपशील द्या. त्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला जाईल.

Advertisement

मात्र, अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल, ज्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल. असं देखील सांगण्यात आलं आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये ऑनलाइन करण्यासाठी महत्वाची तारीख दि. 22 जून 2022 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. 12 जुलै 2022 पर्यंत आहे.

शैक्षणिक पात्रता..

Advertisement

रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. क्रेडिट एनालिस्ट या पदासाठी,

उमेदवारांकडे फायनान्स विषयातील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार नोटीफिकेशन तपासू शकतात.

‘या’ पदांसाठी होणार भरती…

Advertisement

रिलेशनशिप मॅनेजर- 75 (पगार – 89,890 रुपये)
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – 100 (पगार – 69,180 रुपये)
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – 50 (पगार – 78,230 रुपये)