ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

कोट्यवधींना गंडा घालणा-या बापलेकांना अटक

पुणेः कोण कोणाला आणि कशा पद्धतीने गंडा घालील, याचा भरवसाच नाही. पुण्याच्या उपनगरातही भिशी चालवून व्यापा-यांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आला.

या प्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

ही आहेत बापलेकांची नावे

उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह परिसरातील शेकडो व्यापाऱ्यांना भिशीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बाप-लेकांना लोणी काळभोर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली.

गेल्या एक वर्षापासून आरोपी फरारी होते. भरतकुमार चरणदास जोशी, दीपक भरतकुमार चरणदास जोशी, दीपक भरतकुमार जोशी आणि हिरेन भरतकुमार जोशी (सर्व रा. उरुळी कांचन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पाक सीमेवर अटक

पोलिसांनी त्यांना गुजरात-पाकिस्तान सीमेवरून भूज येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी ज्ञानेश्वर नारायण काळभोर (वय ५५, रा. लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली होती.

आरोपींनी लोणी काळभोर परिसरातील अनेक व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सप्टेंबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून आरोपी फरारी होते.

आकर्षक परताव्याच्या आमिषाने फसवणूक

परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ ते २०१९ या दरम्यान आरोपींनी विविध व्यावसायिक कंपन्या स्थापन केल्या होत्या.

या द्वारे त्यांनी एक ते सात वर्षांच्या कालावधीसाठी रक्कम गुंतवल्यास आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले होते. त्यांच्यावर अनेकांनी विश्वास ठेवून कोट्यवधींची गुंतवणूक केली होती.

दिवसेंदिवस या रकमेत वाढ होत होती. गेल्या वर्षी आरोपींनी कोट्यवधींची रक्कम गोळा करून धूम ठोकली. अंदाजे ५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे.

You might also like
2 li