बारामती – बारामती (baramati) शहरातील एका नामांकित वृत्तपत्राचे (journalists) प्रतिनिधी गणेश उर्फ ‘आकाश जाधव’ यांच्यावर गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास त्यांच्यावर हा प्राणघात हल्ला (crime) झाला. यामध्ये आकाश जाधव यांच्या मणक्याजवळ गोळी लागली असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पत्रकारावर (journalists) अशा प्रकारे गोळीबाराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण बारामतीत (baramati) खळबळ उडाली आहे.

बारामती (baramati) येथे भिगवण रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी संध्याकाळी काही हल्लेखोरांनी आकाश जाधव यांचावर गोळीबार केला आहे. ही घटना गुरवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडली असून, यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे आणि पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत त्यास बारामती येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणेश जाधव (वय ३०, रा. तांदुळवाडी) असे जखमी झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. पत्रकार गणेश जाधव यांचे रायजिंग महाराष्ट्र नावाचे वृत्तपत्र आहे. वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास बारामती पोलिस करीत आहेत.

दरम्यान गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, हा घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.