बारामती – तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ (Govind Bagh) पुन्हा फुलले आहे. दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padava) दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे बुधवारी गोविंदबाग (Govind Bagh) येथे नागरिकांना भेटले आणि दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या. कोविडच्या संकटांमध्ये पाडवा (Diwali Padava) शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुललीच नव्हती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने हे तीनही नेते नागरिकांना भेटले.

यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी, छायाचित्र काढण्याची संधीदेखील नागरिकांना मिळाली.

दरम्यान, या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी “पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल असे विधान केले’. लंके यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही सूचक विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाच चर्चा आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असे लोकांचे मत आहे. माझेही हेच मत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहीत पवार यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

आकड्यांचे समीकरण लक्षात घेणे महत्वाचे असून येत्या काळात मित्रपक्षांना विश्वासात घेऊन आमचे पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले. त्यांच्या या व्यक्तव्याची सध्या राजकीयवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं रोहित पवार काय? म्हणाले…

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “राष्ट्रवादीचा एखादा मुख्यमंत्री होत असेल चांगली गोष्ट आहे. दादांसारखा एखादा नेता त्या पदावर गेल्यास राज्याला, पार्टीला त्याचा फायदा होईल.

राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) एकत्र लढतोय. उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास याचा अधिक फायदा सर्वांना होणार आहे. त्यासंदर्भात निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेत असतात.

मोठे निर्णय झाल्यानंतर आमच्यासारखे आमदार त्यांना स्वीकारतात. पण, असा नेता असावा की, जो स्वतः निर्णय घेऊ शकतो. असं ते म्हणाले.