Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

युवा चित्रकाराच्या कुंचल्याची बारामतीकरांना मोहिनी

बारामती शहरातील भिगवण चौकात आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. या आवारातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह बारामती शहरातील विविध ठिकाणे, प्रसिद्ध व्यक्ती आणि मंदिरांसह बरीच चित्रे रेखाटली आहेत. तिथं एका युवा कलाकारानं कुंचल्यातून रेखाटलेली चित्रं बारामती कौतुकाचा विषय ठरली आहे.

लय भारी चित्रं

कलाकाराला वेळ, काळ, वय आणि स्थळांचं भान नसतं. तो कलेच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. त्याच्या कलेच्या प्रवाहाला कितीही मोठं संकट रोखू शकत नाही.

असंच काहीसं बारामतीच्या एका अवलिया युवा कलाकाराबद्दल म्हणावं लागेल. त्यानं आपल्या कुंचल्यातून एकाहून एक सरस चित्रं रेखाटली आहे. आणि त्याच्या लयभारी चित्रांना बारामतीकरांची वाहवा मिळत आहे.

हे आहे युवा अवलियाचं नाव

दीपक रणपिसे असे या युवा अवलिया कलाकाराचं नाव आहे. तो मुंबई येथे कला विद्या संकुलात रेखा व रंगकला या विषयाच्या तिस-या वर्षांत शिकत आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे शिक्षण बंद असल्याने तो घरीच आहे.

आरोग्य विभागात काम करत असलेल्या तरुण मित्रांनी त्याला चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देत त्यासाठी लागणारे रंग व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मदत केली आहे. या चित्रांमुळे परिसराचा कायापालट झाला आहे.

रणपिसे यानं हुबेहूब चित्रं रेखाटली आहेत. येथे येणाऱ्या लोकांना या चित्रातून शहरातील जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, असं आरोग्य विभागप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सांगितलं.

 

Leave a comment