पुणे : सकाळी ६ वाजल्यापासून पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchawad) आणि पुण्यासह (Pune) पूर्ण जिल्ह्याचा (Pune District) वीज पुरवठा (Power supply) खंडित झाला आहे. टॉवर लाईनमध्ये घोटाळा झाल्यामुळे हा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

पूर्ण पुणे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही (400 KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये (Tower Line) 5 ठिकाणी ट्रिपिंग (Triping) झाले आहे.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक ठिकाणचे कामकाज ठप्प झाले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठाही (Water Supply) खंडित झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Advertisement

जिल्ह्यातील लोकांना वीज पुरवठा पुन्हा कधी सुरळीत सुरु होणार हाच प्रश्न पडला आहे. हे ट्रिपिंग होण्यामागचे कारण समोर आले आहे. दाट धुके आणि दवं यामुळे हा बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

महापारेषणचे सर्व वरिष्ठ अभियंता सध्या टॉवर लाइनमधील बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर पेट्रोलिंग करीत आहेत. सर्व ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली आहे.

सकाळी 11 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल. दरम्यान, या कालावधीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण आणि महावितरणकडून करण्यात आले आहे.

Advertisement