कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचा दिलासा अल्पकाळच टिकला. टाळेबंदी उठविल्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा झपाटयानं वाढायला लागली आहे. त्यामुळे पुणेकरांना सावध राहण्याची आवश्यकता आहे.

दररोज हजारांहून अधिक बाधित

पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येने पुन्हा एकदा सातत्याने एक हजारांचा आकडा पार करायला सुरुवात केली आहे. अनलॉक नंतर वाढणारी ही आकडेवारी काळजीचं कारण मानली जात आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने रुग्ण संख्या कमी होत होती. त्यानंतर पुणे शहरात अनेक निर्बंध हटवले गेले होते. ग्रामीण भागात मात्र रुग्ण संख्या कमी होत नव्हती.

Advertisement

त्यामुळे तिथे बंधने कायम ठेवण्यात आली होती; पण अनलॉक नंतर काही दिवस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण संख्या तसेच पॉझिटिव्हिटी रेट वाढायला सुरुवात झाली आहे.

पूर्वीचा तुलनेत हा दिलासा असला तरीदेखील एकूण ही संख्या वाढणे हेदेखील धोक्याचे लक्षण मानले जात आहे.त्यामुळे आता नियमांचे पालन करणे किती अत्यावश्यक आहे तेच यावरून दिसत आहे.

तेव्हा पुणेकरांनो सावरा आणि कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी वेळीच प्रयत्न करा, असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

Advertisement