पुणे : तुम्ही गर्दीमध्ये मोबाईल घेऊन जात असाल तर तुम्हाला आता काळजी घेण्याची गरज आहे. पुण्यात मोबाईल चोरीची (Mobile thief) प्रकरने वाढली आहेत. गर्दीच्या ठिकाणी (Crowded place) मोबाईल चोर तुमच्या मोबाईल वर लक्ष ठेऊन आहेत.

शहरात (City) चोरट्यांनी मोबाईल चोरण्याची दहशत वाढतच चालली आहे. यातच आता पुणे शहरात (Pune city) २०२१ या वर्षात किती मोबाइलला चोरीला गेले आहेत याची धक्कादायक (Shocking) आकडेवारी (Statistics) समोर आली आहे.

२०२१ या वर्षात पुण्यात एकून २९,५१५ मोबाईल चोरी ला गेले होते. यातील फक्त ४९९ मोबाईल परत मिळाले असल्याची माहिती वार्षिक अहवालातून (Annual Report) समोर आली आहे.

Advertisement

तसेच २०२० साली २२,९४३ लोकांचे मोबाईल चोरीला गेले होते. २०२०च्या तुलनेत २०१९ सालीचा आकडा हा कमी होता. २०१९ साली २० हजारापेक्षा कमी मोबाइलला चोरीला गेले होते.

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. भाजी मंडई, बसस्थानक, गर्दीचे रस्ते, शॉपिंग मॉल्स, अशा ठिकाणाहून नागरिकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असताना दिसत आहे.

Advertisement