चौकशीसाठी कार्यालयात २४ तासांत हजर राहा, अन्यथा घरी येऊन चौकशी करू, असा इशारा ईडीने अनिल देशमुख यांना दिला आहे. त्यामुळे आता देशमुख नक्की कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

आॅनलाईन चाैकशी करण्याची मागणी

भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी केली जाणार होती.

त्यासाठी सकाळी ११ वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्सदेखील बजाविण्यात आले होते; मात्र देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.

Advertisement

वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत त्यांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.

अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली बाजू मांडली आहे.

प्रश्नांची काॅपी पाठवा

देशमुख यांच्या या भूमिकेनंतर ईडीने पुन्हा त्यांना निरोप धाडला आहे. तत्पूर्वी, ईडीने २५ जूनला समन्स बजावून मला दुसऱ्या दिवशी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. सीआयआरमध्ये उल्लेख केलेली कागदपत्रं मी प्रतिनिधींकडून पाठवत आहे.

Advertisement

आजही (२९ जून) मी स्वतः चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्ष आहे, आजारपण आणि कोरोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाईन रेकॉर्ड करा.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी जबाब नोंदवेन; मात्र त्याआधी ईडीने प्रश्नांची कॉपी पाठवावी,” अशी मागणी देशमुखांनी पत्राद्वारे केली आहे.

हप्तावसुलीबाबत करणार विचारणा

ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती.

Advertisement

त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते; मात्र त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चाैकशीला जाण्याचे टाळले.