टाकळी भीमा येथील घोलपवाडी येथील एका महिलेला किरकोळ कारणातून विळ्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कैलास महादू वडघुले, विवेक कैलास वडघुले, संगीता कैलास वडघुले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

टाकळी भीमा ता. शिरुर येथील सविता वडघुले हि महिला घरात असताना कैलास वडघुले हे महिलेच्या घरासमोर येऊन महिलेसह तिच्या पतीला शिवीगाळ करु लागले दरम्यान महिलेने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता कैलास यांनी महिलेच्या पतीला विळ्याने मारहाण केली.

याबाबत सविता किसन वडघुले (रा. घोलपवाडी टाकळी भीमा ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी कैलास महादू वडघुले, विवेक कैलास वडघुले, संगीता कैलास वडघुले (सर्व रा. घोलपवाडी टाकळी भीमा ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.