प्रेमप्रकरणामधून एका तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. यात या दोघांचा मृत्यू झाला.

ही घटना पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये घडली. बाळू सीताराम गावडे आणि राहुल दत्तात्रय गावडे, अशी मृत तरुणांची नावे आहेत.

बाळू हा एका वीटभट्टीवर कामाला होता. या वीटभट्टीच्या मालकाची मुलगी १४ तारखेला बाळूसोबत पळून गेली. मालकाची मुलगी पळवून नेण्यासाठी बाळूला राहुलने मदत केली.

Advertisement

यानंतर विटभट्टी मालकाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने दोन दिवस शोध घेत या तिघांना शोधून काढलं. गुरुवारी या तिघांचा शोध लागल्यानंतर त्यांना विटभट्टी मालकाने साथीदारांच्या मदतीने मारहाण केली.

आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी रॉर्ड्सने या दोघांना मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

बाळूसोबत पळून गेलेल्या मुलीलाही मारहाण करण्यात आली आहे. ही मुलगीही जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

मयत बाळू गावडेचा विवाह झालेला आहे. या दुहेरी हत्याकांड प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली.

संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,अशी माहिती अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलीलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या मुलीच्या वडिलांसह सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या सहा जणांना ताब्यात घेऊन प्रकरणाची चौकशी सुरु केली.

Advertisement