Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पवारांमुळे ठाकरे मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादी कुणामुळे सत्तेत?

“शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे.

कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?” असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ते किशोर कान्हेरे यांनी विचारला आहे.

वाद चिघळला

नारायणगाव बाह्यवळण रस्त्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उद्‌घाटन केल्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Advertisement

त्यावरून खासदार कोल्हे यांनी पवार यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अशी टीका केली होती. त्यावरून आता वाद चिघळला आहे.

स्मरणशक्तीचा विसर

किशोर कान्हेरे यांनी खा. कोल्हे यांच्यावर कडवट टीका केली. कोल्हे यांच्या स्मरणशक्तीच्या परीक्षेची वेळ आली आहे.

तयार स्क्रिप्ट वाचून बडबड करणारे कलावंत कधी कधी स्मरणशक्ती विसरतात, तसेच अमोल कोल्हे यांचे आज झाले, आपण ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो त्यांनाच ते आज विसरले, अशा शब्दांत त्यांनी कोल्हे यांना टोला लगावला.

Advertisement

अंगापेक्षा पोंगा जास्त

ज्या उद्धव साहेबांच्या मेहेरबानीमुळे राजकारणात आलो, त्यांनाच ते आज विसरले. अंगापेक्षा पोंगा जास्त झाला की होते असे, अहो कोल्हे, ज्या उद्धव साहेबांमुळे आपल्याला आणि आपल्या पक्षाला सत्तेची फळे चाखायला मिळाली किमान त्यांना तरी विसरू नका” असा सल्ला कान्हेरे यांनी दिला.

फार डोके चालवू नका

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दस्तुरखुद्द शरद पवार सतत उद्धव ठाकरे यांच्यांशी सल्ला मसलत करत राज्य कारभार चालवत आहेत.

तुम्ही कशाला फार विचार करता, तेवढी तुमची कुवत पण नाही आणि क्षमता पण; दिग्दर्शकाने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचा आणि अभिनय करून पोटापाण्याचे पाहा, फार डोके चालवू नका” अशा शब्दांत त्यांनी कोल्हे यांच्यावर हल्लाबोल चढवला.

Advertisement

काय म्हणाले होते अमोल कोल्हे ?

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत. टाळेबंदीमुळे कार्यक्रम होत नव्हते, म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे.

निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे; मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण शिरूर मतदार संघातही अनुभवतोय.

दुर्दैवाने ती जुन्नर तालुक्यातही अनुभवायला मिळत आहे. वयस्कर नेत्याने असं पोरकटपणाने वागणं याचं मला आश्चर्य वाटतं.” असं कोल्हे म्हणाले होते. त्यांचा रोख आढळराव पाटील यांच्याकडे होता.

Advertisement
Leave a comment