पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने (Ministry of Health) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात करोनाबाधितांसह मृत्यूची संख्या किंचित घटली (Corona Update) आहे, मात्र धोका कायम आहे.

देशात गुरुवारी 20 हजार 409 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी 20 हजार 557 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली असून 44 रुग्णांचा मृत्यू झाला.

आजच्या रुग्णसंख्येत किंचित घट झाली असली तरी देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजारांवर पोहोचली आहे.

दरम्यान, देशापाठोपाठ आता महाराष्ट्रात गुरुवारी 2203 नव्या रुग्णांची भर पडली असून 2478 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

तसेच गेल्या 24 तासांत तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात 2138 रुग्णांची भर पडली होती. राज्यात आतापर्यंत 78,79,766 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या नवीन करोना (Corona Update) रुग्णांची संख्या किंचिंत कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे.

मात्र, अशीच रुग्णांमध्ये झपाट्याने वाढली तर संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.