पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये (Corona Update) देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार गुरुवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यातील (pune gramin) 235 जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली.

मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या 235 नवीन रुग्णांपैकी 145 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहेत. 48 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात, तर 42 रुग्ण जिल्ह्याच्या उर्वरित भागात आढळले आहेत.

पुणे महापालिका परिसरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या 235 नव्या रुग्णांमुळे पुणे जिल्ह्यातील एकूण करोना रुग्णसंख्या 14 लाख 94 हजार 912 एवढी झाली आहे. जिल्ह्यातील 1791 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, करोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी विशेषत: जोखीम गटातील रुग्ण, सहव्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी तसेच लसीकरण न झालेल्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गुरुवारी दिवसभरात आढळलेल्या नवीन करोना (Corona Update) रुग्णांची संख्या किंचिंत कमी झाली असली, तरी आरोग्य विभागासमोर चिंतेचं वातावरण आहे.

मात्र, अशीच रुग्णांमध्ये झपाट्याने वाढली तर संभाव्य चौथ्या लाटेची चिंता देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.