पुणे : तुम्ही अनेक वेळा घराच्या शेजारून किंवा घराच्या छतावरून विदयुत (Electric) तारा गेल्याचे पहिले असेल. त्याच विदयुत तारांचा शॉक (Electric shock) लागून एका तरुणाचा मृत्यू (Young death) झाला आहे.

पुण्यातील लोणी काळभोर (Loni kalabhor) परिसरातील एका इमारतीच्या शेजारून उच्च दाबाच्या विदयुत तारा गेल्या होत्या. त्याच विदयुत तारांचा शॉक बसून २१ वर्षाच्या तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू (Death) झाला आहे.

इमारतीच्या शेजारून गेलेल्या विदयुत तारांची कोणतीही काळजी घेतली नसल्यामुळे इमारत मालकावर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

शुभम संचित परब (Shubham Sanchit Parab) (वय २१) असे शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. इमारतमालक संभाजी दादासाहेब भाडळे (Sambhaji Dadasaheb Bhadale) (वय ४२ रा. उरुळी देवाची) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरुळी देवाची पोलीस ठाण्यात (Uruli Devachi police station) इमारतीवरून एकजण खाली पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर(Police Sub-Inspector Pramod Hambir), पोलीस हवालदार सागर वणवे, व जोशी हे त्याठिकाणी गेले.

त्यांनी शुभम परबला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी नंतर मृत घोषित केले. त्यामुळे लोणी काळभोर पोलिस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) आकस्मिक मृत्यूची (Accidental death) नोंद करण्यात आली आहे.

Advertisement