Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

कोणत्याही आर्थिक ठिकाणी नॉमिनी संदर्भात सावधानता बाळगा ; छोटीशी चूक मुलांना आणेल रस्त्यावर, जाणून घ्या …

मनुष्य आपल्या जीवनात अनेक आर्थिक उलाढाली करत असतो. जीवन समृद्ध करण्यासाठी, सुखसोयींनी जीवन आनंदमयी करण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात.यात साधारणतः व्यक्ती   विविध प्रकारचे कर्ज, ईएमआय, सेव‍िंगस, खाते उघडणे, पॉलिसी घेणे आदी करत असतो.

जेव्हा आपण कोणतेही आर्थिक काम करत असतो तेव्हा आपणास प्रत्येक वेळी नॉमिनी नोंदवावी  लागते. बँक खाते उघडल्यानंतर खातेदारास नामनिर्देशन करण्याचा हक्क आहे. बहुतेक असे पाहिले गेले आहे की लोक त्यांच्या जोडीदारास आणि मुलांना नामनिर्देशित (नॉमिनी ) म्हणून बनवतात.

अशा परिस्थितीत, कोठेही नामनिर्देशित (नॉमिनी ) व्यक्तीचे नाव देताना बरेच लक्ष देणे आवश्यक आहे कारण आपली थोडीशी चूकही भारी पडू शकते.

नॉमिनी महत्त्वाचे का आहे ?

नॉमिनी व्यक्तीबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. आपण आपले नॉमिनी आपले जीवन साथीदार (जोडीदार), आपले मूल, आपले पालक, कुटूंबातील एखादा सदस्य किंवा एखादा खास मित्र बनवू शकता.

मालमत्तेच्या मालकाच्या मृत्यू नंतर नॉमिनी व्यक्तीची खरी भूमिका असते. नॉमिनी नसताना पैसे मिळणे अवघड आहे. जर नॉमिनी व्यक्ती  नसेल तर पैसा बराच काळ अडकला जाऊ शकतो.

कायदेशीर तपासणी करण्यासाठी त्यांना बराच काळ लागतो. परंतु नॉमिनी राहिल्यास प्रक्रिया अधिक सुलभ होते.

नॉमनी कोठे महत्वाचे आहे ते जाणून घ्या –

  • १) विमा घेताना नामनिर्देशित व्यक्तीची आवश्यकता असते. येथे  एकापेक्षा जास्त नामनिर्देशित व्यक्ती असू शकतात. आपण आपले पालक, जोडीदार किंवा मुले यांचे नाव नोंदवू शकता. लाइफ इन्शुरन्समध्ये कायदेशीर वारस नेमलेले असणे अधिक चांगले.

    २) बँकेत खाते उघडताना आपण एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्रालाही नॉमिनी करू शकता. नॉमिनी  व्यक्ती कायदेशीर वारस असणे आवश्यक नसते. नॉमिनी  म्हणून केवळ एका व्यक्तीची नियुक्ती केली जाऊ शकते. संयुक्त खात्यातील रक्कम प्रथम दुसर्‍या धारकाला आणि नंतर नॉमिनीला मिळते.

    ३) गुंतवणूकीच्या वेळी नॉमिनी करणे देखील महत्वाचे आहे. येथे लक्षात ठेवा आपण केवळ एका व्यक्तीस नामनिर्देशित करू शकता. डिमॅट खात्यात अनेक नॉमिनी  नियुक्त करता येतील. येथे नॉमिनी व्यक्ती केवळ केयरटेकरच नाही तर मालक देखील असतो. नॉमिनी व्यक्तीला तो हिस्सा कायदेशीर वारसांकडे वर्ग करावा लागणार नाही.

‘हे’ आहेत नॉमिनीचे आवश्यक नियम –

– नॉमिनी अल्पवयीन असेल तर गार्जियन नियुक्त करणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक नॉमिनीची नेमणूक करता येईल.
– नॉमिनी व्यक्ती बर्‍याच वेळा बदलली जाऊ शकते. नामनिर्देशित व्यक्तीस नेहमीच मालमत्तेचा हक्क नसतो.
– नॉमिनी दाखवल्यानंतरही वसीयत करणे आवश्यक आहे.   नॉमिनी आहे परंतु वसियत नसेल तर   कायद्यानुसार मालमत्तेची विभागणी केली जाते.

एनपीएस अकाउंटमध्ये नॉमिनी ऑनलाईन बदला

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या खातेदारांना नवीन सुविधा मिळाली आहे. या सुविधेअंतर्गत, ज्यांना आपल्या खात्यात नॉमिनी बदलायचे आहे ते हे काम ऑनलाइन करू शकतात.

ग्राहकांच्या हितासाठी, पेन्शन फंड नियामक पीएफआरडीएने नॉमिनी व्यक्तीला बदलण्यासाठी ई-साइन सुविधा दिली आहे.

Leave a comment