पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे.

मनसेकडून (MNS) सुद्धा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करण्यात आली आहे. ‘देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत’ अशा शब्दात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

महाजन म्हणाले की, “भरात जोड यात्रा असं काँग्रेसने नावं कसं दिलं मला माहित नाही. कारण काँग्रेसच्या राजकीय धोरणामुळे भारताची फाळणी झाली हे कटू सत्य आहे. पण आज तीच काँग्रेस भारत जोडो यात्रा करते, तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय आहे.

पुन्हा बांगलादेश आपल्यात मिसळायचं आहे का? असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु असून, पक्षाचे नेते आता चालण्याचा सराव करतायत. कारण हे नेते कधी चाललेच नाही असा टोलाही महाजन यांनी लगावला.

दरम्यान, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत (bharat jodo yatra) पुण्यातील 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत.

यावेळी राज्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. नुकतंच झालेल्या पत्रकार परिषदेत मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली.