पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली असून, या यात्रेचा 66 वा दिवस आहे. तर महाराष्ट्रातील यात्रेचा (bharat jodo yatra) आजचा सहावा दिवस आहे.

इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातून देखील राहुल गांधींच्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे. ही यात्रा काल नांदेड जिल्ह्यातून हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात दाखल झाली आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचं स्वागत केलं जात आहे.

दरम्यान, या यात्रेसाठी (bharat jodo yatra) राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी देखील केली आहे.

आज, सकाळी ही भारत जोडो यात्रा दाती फाटा येथून कळमनुरीच्या दिशेने निघाली असून, कोल्हापुरात दाखल झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी कोल्हापूरकरांच्या कुस्तीचा थरार अनुभवलाय. कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी या कुस्त्याचे आयोजन केले होते.

महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेतेही या यात्रेत सहभागी झाले आहेत.

काल शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही या यात्रेत (bharat jodo yatra) सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन चार दिवस झाले आहेत. या यात्रेला महाराष्ट्रातील काँग्रेसहित अनेक घटक पक्षातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे.

दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यातून जिल्ह्यातून भारत जोडो यात्रेचा (bharat jodo yatra) प्रवास होणार आहे. यातील नांदेड जिल्ह्यातील यात्रेचा प्रवास पूर्ण झाला आहे. आता ही यात्रा हिंगोली जिल्ह्यात पोहोचली आहे.

राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम,अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यातून 14 दिवसात या यात्रेचा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.