पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली असून, या यात्रेचा 60 पेक्षा जास्त दिवस आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून आपल्या राज्यात भारत जोडो यात्रेची चांगलीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे (bharat jodo yatra) महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असल्याचे दिसून आले आहे. या यात्रेमध्ये (bharat jodo yatra) महाराष्ट्रातील अनेक नेत्यांपासून हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

अश्यातच नुकतंच भारत जोडो यात्रेच्या (bharat jodo yatra) समर्थनार्थ संपूर्ण खेड तालुक्यातून रविवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं. या यात्रेचे राजगुरुनगर, चाकण , आळंदी मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व पुरोगामी विचारांच्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते. या वेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (bharat jodo yatra) समर्थन देण्यासाठी राजगुरूनगर पासून चाकण ते आळंदी अशी पदयात्रा काढण्यात आली होती.

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वंदना सातपुते, कॉंग्रेसचे प्रवक्ते निलेश कड पाटील, चाकण शहराध्यक्ष, आनंद गायकवाड, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष जमीर काझी, राम गोरे, कुमार गोरे, सरफराज सिकीलकर,

मुबीन काझी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या जाधव, अमोल दौंडकर, काळूराम कड, बाळासाहेब पठारे, अशोक जाधव, सतीश राक्षे, विलास कातोरे, अस्लमभाई सिकीलकर यांच्यासह महविकास आघाडी पदाधिकारी, नागरिक यामध्ये सहभागी झाले होते.