ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

भास्कर जाधव अध्यक्ष व्हायला तयार पण…

भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित करून, अधिवेशन सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाच्या भूमिका पार पाडणा-या भास्कर जाधव यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यावर तीनही पक्षांचे एकमत झाले असण्याचं सांगण्यात येत असलं, तरी त्या बदल्यात शिवसेनेला वनमंत्रिपदाचा त्याग करावा हे जाधव यांना मान्य नाही.

तरच विधानसभेचा अध्यक्ष होणार

महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेने स्वीकारावं, असं जाधव म्हणाले.

तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं; मात्र त्या बदल्यात शिवसेनेनं आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलं. जाधव गुहागरमध्ये बोलत होते.

शिवसेनेला आधीच महत्त्वाची खाती कमी

शिवसेनेकडं आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत जाधव यांनी व्यक्त केले.

कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं हे तिन्ही पक्षांनी मिळून ठरवायचं असतं. जाधव जर अध्यक्ष झाले, तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालं.

शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम आहे. शिवसेनेकडे वनखातं तसंच ठेवून जर अध्यक्षपद मिळत असेल तर घ्यावं.

एक तर शिवसेनेकडे महत्त्वाची खातीच नाहीत. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिपद सोडून अध्यक्षपद घ्यावं असं मला वाटत नाही, असंही भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय.

भास्कर जाधव यांना अतिरिक्त सुरक्षा

गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा झाला.

इतकंच नाही तर अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप जाधव यांनी केला. त्यानंतर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत.

 

 

You might also like
2 li