पुणे – हिंन्दू पंचांगातील पवित्र श्रावण महिना (Shrawan Mahina) आज पासून म्हणजेच, 1 ऑगस्टपासून सुरु झाला आहे. श्रावण महिना (Shrawan Month) भगवान शंकराला खूप प्रिय समजला जातो. या महिन्यातील सोमवारच्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. यंदा श्रावण महिन्यात (Shrawan Mahina) 4 सोमवार आहेत. श्रावण सोमवारी महादेवाची पूजा (Mahadevachi Pooja) केल्याने भाविकांना अपेक्षित फळ मिळते अशी मान्यता आहे.

श्रावण महिना भगवान शिव (Lord Shiva) यांना खूप प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा (Lord Shiva Pooja) विशेष फलदायी असते.

या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. आणि दिवसाचे औचित्य साधून बारा ज्योतिर्लिंगपैकी एक भिमाशंकरला (Bhimashankar) पहाटेची महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक करण्यात आला.

Advertisement

आज पहिला श्रावणी सोमवार असून, सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर देवस्थान परिसरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

आज सकाळी महाआरती करत मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक (Mahadevachi Pooja) करण्यात आला. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर (Temple) खुले करण्यात आले.

सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर (Bhimashankar) देवस्थान, बारा ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रातील सहाव्या ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.

Advertisement

हिरव्यागार वातावरणात, पांढऱ्या शुभ्र धुक्यात वेढलेला हा परिसर रिमझिम पाऊसात (Rain) न्याहाळुन गेला याच वातावरणात भाविकांच्या लांबलच रांगा पहाटेपासुन लागल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

दरम्यान, श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केला पाहिजे.

असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.

Advertisement