पावसाळ्याच्या पहिल्या दोन महिन्यांत घाटमाथ्याकडे न फिरकलेल्या पावसाने आता तिथे चांगलाच जम धरला आहे. अक्षरशः कोसळधारा सुरू आहेत.

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेल्या बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या मुख्य मंदिराला इतिहासात प्रथमच वेढा घातला आहे.

ढगफुटीसारखा पाऊस

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे.

Advertisement

मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मुख्य मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे.

मंदिराला पाण्याचा वेढा

गेल्या 24 तासांपासून पुणे, जुन्नर, खेड या भागांत दमदार पाऊस कोसळत आहे. त्यातही भीमाशंकर परिसरात गेल्या अनेक तासांपासून दमदार पावसाची बॅटिंग सुरू आहे.

Advertisement

काल आणि आज भीमाशंकर परिसरात जोरदार पाऊस पडल्याने मंदिराच्या बाजुच्या डोंगरातून पुराचा लोट मंदिरात आला आहे. त्यामुळे मुख्य मंदिरात पाणी साचलं आहे.

पुराच्या पाण्याचा प्रवाह वळला अचानक

मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने पुराच्या पाण्याचा प्रवाह अचानक वळून तेच पाणी मंदिरात आलं आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांना प्रवेश नाही.

मंदिरात केवळ पुजारी असतात. मंदिरात दैनंदिन पूजा-अर्चा सुरू असते; मात्र आता पाण्याच्या वेढा वाढल्याने प्रशासनाने पुजारी आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांनाही योग्य ते सूचना दिलेल्या आहेत.

Advertisement