पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनतर शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांना धक्काबुक्की करत जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या अंगावर धावत जात त्यांना धक्काबुक्की (Pushback) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिवसैनिकांचा रोष पाहता भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणावरून लगेच जावे लागले आहे.

Advertisement

या सर्व प्रकरणानंतर किरीट सोमय्या यांनी एक ट्विट (Twit) केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे ट्विट त्यांनी केले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या घटनेचा निषेध केला आहे. सरकार तुमचे आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे.

जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? अशा शब्दात तीव्र निषेध त्यांनी नोंदवाला आहे.

Advertisement