पुणे : दहावी (Tenth) व बारावीचे (Twelfth) विद्यार्थी ऑफलाईन (Offline Exam) परीक्षा न होता ती ऑनलाईन (Online Exam) स्वरूपात घेण्यात यावी यासाठी रस्त्यावर उतरले होते. याबाबत बोर्डाकडून आज पत्रकार (Press Conference) परिषदेमध्ये या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Chairman of the Board Sharad Gosavi) यांनी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याची महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच परीक्षा देण्यात येणार असल्याचेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

यावेळी परीक्षा कधी होणार आहेत याबाबतही माहिती देण्यात आली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा (12 th Exam) ४ मार्च ते ३० मार्च या दरम्यान होणार आहेत. तसेच प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

तसेच या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना समाधान कारक मार्क्स वाटत नसतील तर त्यांना पुन्हा एकदा प्रात्यक्षिक परीक्षा देता येणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील प्रात्याक्षिक परीक्षा ३१ मार्च ते १८ एप्रिल या दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

इयत्ता १० वी ची परीक्षा (10 th Exam) १५ मार्च ला होणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. अशी माहिती बोर्ड अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.